पोलिसानं मुळे झाले अजून एका खेळाडूचे भविष्याची वाताहत | Police Latest News

2021-09-13 0

मोठी स्वप्न घेवून ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या राष्ट्रीय महिला खेळाडूच्या स्वप्नाचा पोलिसांच्या वाहनाचा धडकेने चक्काचूर झाला. आता ती मैदानावर पुन्हा कधीच पावूल ठेवू शकणार नाही. जिच्या छोट्याश्या नोकरीवर घर चालत होत. तिचा कणाच ह्या अपघातात मोडला आहे. हॉटेलमध्ये पोळ्या करून संसार चालविणारी तिची आईही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. येथेच या कुटुंबाची परवड थांबली नाही, तर त्यांच्या उपचारासाठी लागणारा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. आडगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून आपल्याच सहकाऱ्याला वाचवले, तर पोलीस आयुक्तांनी या कुटुंबाची बोळवण करून जखमेवर मीठ चोळले. जेलरोडच्या कोयनानगर सोसायटीतील हर्षदा शिवकुमार माळवे (वय 26) 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दुचाकीवर आई सुरेखासह जेलरोडहून टाकळीमार्गे निघाली होती. टाकळीतील नव्या पुलावर समोरून ओवरटेक करून आलेल्या पोलिसाच्या मारुती कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. हेल्मेट असतानाही हर्षदा यात गंभीर जखमी झाली, तर तिची आईही गंभीर जखमी आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires